कचराकुंडी नसल्यानं रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

 Borivali
कचराकुंडी नसल्यानं रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

बोरीवली - बोरीवली नॅन्सी कॉलनीशेजारच्या जैन मंदिर रोडवर घाणीचं साम्राज्य पसरलंय. परिसरात कचरा कुंडीच नसल्याने रहिवासी रस्त्यावरच कचरा फेकतायत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालाय. तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर कचरा कुंडी बसवावी वा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी रेश्मा नाईक यांनी केली आहे.

Loading Comments