Advertisement

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी

हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे.

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी
SHARES

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही प्रवास करत होती असं सांगितलं जात आहे.

या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडल्यांच सांगितलं जात आहे.

हेलिकॉप्टरमधील लोकांची यादी

  1. बिपिन रावत
  2. मधुलिका रावत
  3. ब्रिगेडियर एलएस लिद्दर
  4. लें. क. हरजिंदर सिंह
  5. नायक गुरसेवक सिंह
  6. नायक. जितेंद्र कुमार
  7. ले. नायक विवेक कुमार
  8. ले. नायक बी. साई तेजा
  9. हवलदार सतपाल

मिळालेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.

डिसेंबर २०१९ मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा