Advertisement

नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी, केंद्राकडून राज्यांना 'या' सुचना

ओमिक्रॉन रोखण्यासाठी राज्यांनी काय तयारी केली त्याचा आढावा आज केंद्र सरकारनं घेतला.

नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी, केंद्राकडून राज्यांना 'या' सुचना
SHARES

आतापर्यंत १६ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे २६९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं या नव्या विषाणूची गंभीर दखल घेतली आहे.

ओमिक्रॉन रोखण्यासाठी राज्यांनी काय तयारी केली त्याचा आढावा आज केंद्र सरकारनं घेतला. तसेच ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी घालण्यापर्यंतच्या सूचनाही दिल्या आहेत.

राज्यांमधील जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह केसेस, डबल रेटिंग आणि क्लस्टरवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारनं यावेळी दिल्या. त्याशिवाय राज्यांना सण आणि स्थानिक स्तरावर प्रतिबंध घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दोन डोसमुळे कोरोनापासून बचाव होतो. तसंच ओमिक्रॉनची लागण आणि रुग्णालयात भरती होण्यापासून दोन डोसच बचाव करू शकतात. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण करा, असा सल्लाही केंद्रानं राज्यांना दिला आहे.

केंद्राकडून करण्यात आल्या 'या' सुचना

  • नाईट कर्फ्यू लावा, गर्दी रोखा. येणारे सण पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवा.
  • कोरोनाच्या केसेस वाढल्यास कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन तयार करा.
  • टेस्ट करा, घरोघरी जाऊन रुग्ण शोधा आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवा.
  • रुग्णालयात बेड, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय उपकरणे वाढवण्यावर भर द्या.
  • ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवला पाहिजे. ३० दिवसांच्या औषधांचा स्टॉक तयार ठेवा.
  • सातत्यानं माहिती द्या, त्यामुळे अफवा पसरणार नाहीत. राज्यांनी रोज पत्रकार परिषद घ्याव्यात.
  • राज्यात १०० टक्के लसीकरण करण्यावर भर द्या. ज्येष्ठांना दोन्ही डोस द्या.

दरम्यान, राज्यात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ३७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के आहे.

राज्यात आज २३ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ८८ ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ४२ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.हेही वाचा

रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर चर्चा सुरू - अजित पवार

नाताळवरही ओमिक्रॉनचं सावट, सरकारची नियमावली जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा