Advertisement

मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक डोअर लोकलची चाचणी

डिसेंबरअखेर मुंबईत स्वयंचलित दरवाजांची विना वातानुकूलित लोकल सुरू करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे नियोजन आहे.

मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक डोअर लोकलची चाचणी
SHARES

विना वातानुकूलित लोकलच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी मध्य रेल्वेच्या मुंबई (mumbai) विभागाने कुर्ला (kurla) कारशेडमध्ये 30 सप्टेंबरला पार पाडली.

या लोकलच्या डब्यातील दरवाजांतून हवा खेळती राहावी, यासाठी जाळीचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरअखेर मुंबईत स्वयंचलित दरवाजांची विना वातानुकूलित लोकल सुरू करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे नियोजन आहे.

जूनमध्ये मुंब्रा स्थानक परिसरात कसारा - सीएसएमटी (csmt) आणि सीएसएमटी - कर्जत लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर आठ प्रवासी जखमी झाले होते.

दरवाजात लटकत प्रवास करताना हे प्रवासी पडले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल वातानुकूलित आणि सध्या सेवेत असलेल्या विना वातानुकुलित लोककला स्वयंचलित दरवाजे (autamatic door)लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले आहेत. याच्या चाचणीच्या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना उपस्थित होते.

हे दरवाजे बंद झाल्यावर हवा खेळती राहण्यासाठी दरवाजाच्या खालील भागात जाळी लावण्यात आली आहे. वरील बाजूस काचेचा वापर करण्यात आला आहे. दरवाजाच्या मध्यभागी झडपा असून पावसाळ्यात पाणी आत येऊ नये, या पद्धतीने त्या बसवण्यात आल्या आहेत.

वातानुकूलित लोकलच्या वेळेप्रमाणे अर्थात 10 सेकंदांत दरवाजे उघड - बंद होण्याची, हालचाल होताना अलार्मची व्यवस्था या विना वातानुकुलित ट्रेनच्या दरवाजासाठीही करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये कुर्ला कारशेडमध्ये लोकलमधील (local) सामान्य श्रेणीच्या एका डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले होते. यावेळी दरवाजे जाळीदार बनवण्यात आले होते.

त्या तुलनेत हवा अधिक खेळती राहण्याची व्यवस्था सुधारित दरवाजांत करण्यात आली आहे. याच आधारे संपूर्ण लोकलचे (mumbai local) दरवाजे तयार करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

पुढील दोन दिवसात राज्यातील पाऊस ओसरणार

दसरा मेळाव्यानिमित्ताने वाहतुकीत मोठे बदल, या रस्त्यांवर NO Entry!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा