Advertisement

'कस्तूरबा'मध्ये योग्य उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

कस्तुरबा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने सफाई कामगाराच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

'कस्तूरबा'मध्ये योग्य उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू
SHARES

कस्तुरबा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने सफाई कामगाराच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वृषाली कांबळे (५२) असं या महिलेचे नाव असून, त्यांचा रविवारी मृत्यू झाला आहे. वरळी इथं राहणारे रामचंद्र कांबळे यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती.

वृषाली कांबळे यांच्यावर कस्तुरबामध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान रुग्णालयातील आया आणि परिचारिका त्यांच्याकडं दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे पती रामचंद्र कांबळे यांनी निदर्शनास आणत पत्नीचे रुग्णालयात होणारे हाल चित्रफितीतून प्रशासनापुढे मांडले होते. 

वृषाली या २४ तासांहून अधिक काळ शौच केलेल्या कपड्यांमध्ये पडून होत्या. तरी रुग्णालयातील कोणीही लक्ष दिले नाही. त्यांना प्यायला गरम पाणीही मिळत नव्हत. या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर वृषाली यांचे कपडे बदलण्यात आले. तसेच त्यांना पिण्यासाठी गरम पाणीही देण्यात येऊ लागले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी वृषाली यांचा मृत्यू झाला.

रामचंद्र कांबळे यांची मुलगी ममता हीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, वृषाली यांना काहीही खाण्यासाठी दिल्यास त्या उलटी करत होत्या. मागील चार-पाच दिवसांपासून त्यांना दम लागत होता. मात्र तरीही त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिच्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. परंतु दुसरी चाचणी केल्यावर त्यांना संसर्ग झाल्याचे समजले. 

डॉक्टरांनी सुरुवातीलाच लक्ष दिले असते तर तिला वेळेत उपचार मिळू शकले असते, असे त्यांची मुलगी ममता  यांनी सांगितले. यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा