Advertisement

शिक्षक करणार बोलीभाषा, म्हणी, उखाणे, ओव्या, पाळणे यांचे संकलन


शिक्षक करणार बोलीभाषा, म्हणी, उखाणे, ओव्या, पाळणे यांचे संकलन
SHARES

देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन होण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. बोलीभाषांच्या जतनासाठी मुंबई मराठी अध्यापक संघाने संकलनाचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे.


शिक्षकांच्या मदतीने संकलन

मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून निरनिराळ्या बोलीभाषांचा परिचय होण्यासाठी बोर्डाने आणि बालभारतीने काही निवडक बोलीभाषेतील उतारे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. त्या अनुषंगाने इतरही काही बोलीभाषा आहेत. कदाचित काही काळांनी या बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी त्या-त्या बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, पोवाडे, ओव्या, अभंग, लोकगीते, पाळणे, काही महत्त्वाचे निवडक शब्द, स्वागत करण्याच्या पद्धतीचं संकलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने केला आहे. राज्यातील विविध भागांतील जिल्ह्यातील विविध शाळांमधून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने याचं संकलन होणार असून त्यासाठी फॉर्म तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पामध्ये बोलीभाषेचे नाव, बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, ओव्या, पाळणे, लोकगीते, अभंग, पोवाडे, बोलीभाषेतील नेहमीच्या व्यवहारातील ५० शब्द, उतारे, बोलीभाषेतील शेती विषयातील शब्द, शालेय जीवनाशी निगडीत शब्द, सणांची, अन्नपदार्थांची नावे या मुद्द्यांवर शिक्षक आपल्या परिसरातून माहिती संकलित करणार आहेत.

यावर एक पुस्तिका बनवली जाणार असून शिक्षक संघाच्या जून आणि सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्धीही दिली जाणार आहे. मराठी प्रमाणेच इतर बोलीभाषेच्या जतनासाठी हा एक प्रयत्न आहे. 
- अनिल बोरनारे, कार्यवाह, मुंबई मराठी अध्यापक संघ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा