Advertisement

शिथिलीकरणानंतर वाहनांच्या गर्दीत वाढ


शिथिलीकरणानंतर वाहनांच्या गर्दीत वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा असून या टप्प्यात अनेक सुविधांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच, सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई आणि उपनगरील महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपेक्षा तुलनेनं गर्दीत वाहनांच्या गर्दीत वाढ झाली.

टाळेबंदीमध्ये आतापर्यंत प्रतिबंधित असलेल्या व्यवसायांपैकी काही व्यवसायांना २० तारखेपासून परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर सरकारी कार्यालयातील उपस्थितीत वाढ करून १० टक्क्यांवर नेण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर कार्यालय गाठण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवाशांमध्ये काही प्रमाणात वाढ दिसून आली. तसेच आतापर्यंत बंद असलेली टोल आकारणीदेखील २० एप्रिलपासून सुरू झाल्यानं इतके दिवस बंद झालेल्या टोलवरील रांगा पुन्हा दिसू लागल्या.

सोमवारी मुंबईतील रस्त्यावर भाजीबाजार वगळता इतरत्र मात्र तुलनेनं शांतता होती. मात्र मुख्य रस्त्यांवर काही ठिकाणी वाहनांची बरीच गर्दी दिसून आली. त्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या अधिक होती. टाळेबंदी असली तरी सकाळच्या वेळी भाजीपाला, दूध, किराणा वगैरे खरेदीसाठी गर्दी, दुपारी टळटळीत उन्हामुळे रस्त्यांवर नीरव शांतता आणि सायंकाळी पुन्हा गर्दी असे चित्र सोमवारीदेखील कायम होते.

बसून खाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी नाष्ट्याचे पदार्थ, फरसाण आणि मिठाईच्या दुकानांनदेखील परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी मिठाईच्या दुकानं उघडलीच नाहीत. मात्र दुसरीकडे काही किरकोळ ठिकाणी वडापाव, समोसे आणि चहाची विक्री सुरू झाली. मात्र या विक्रीसाठी चढे भाव लावले जात होते. १५ रुपयांना वडापाव आणि १० रुपयांना चहा अशी विक्री सुरू होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा