Advertisement

कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात २२ हजारांना डिस्चार्ज

​शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ३१७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकच दिवशी तब्बल २२ हजार ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत

कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात २२ हजारांना डिस्चार्ज
SHARES

शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ३१७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकच दिवशी तब्बल २२ हजार ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळं रुग्णालयांमध्ये १६.८ टक्केच खाटा भरल्या आहेत. मात्र मृत्यूचा आकडा मागील काही दिवसांत वाढताना दिसून येत आहे.

मुंबईत आतापर्यंत नऊ लाख ८१ हजार ३०६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८९ टक्के रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. शुक्रवारी बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी ९ हजार ५०६ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तर लक्षणं असलेले एकूण ६ हजार ४३२ रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी एकूण २ हजार ८२४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र वाढलं आहे. त्यामुळं आतापर्यंत ८ लाख ७७ हजार ८८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४ हजार ३५२ सक्रीय रुग्ण आहेत.

सेव्ह लाईफ मिशनच्या माध्यमातून महापालिकेने कोविड मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणले आहे. आतापर्यंत आठवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर दररोज २ ते ३ मृत्यू होत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा किंचित वाढला आहे.

शुक्रवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ रुग्ण पुरुष व ३ रुग्ण महिला होत्या. यापैकी ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर आणि ४० वर्षांवरील २ रुग्णांचा समावेश होता. तर एक रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होता. आतापर्यंत एकूण १६ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा