Advertisement

वेसावा गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू


वेसावा गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू
SHARES

कोरोनामुळं मुंबई रेड झोनमध्ये आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मुंबईतील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारी नियंत्रणा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. अशातच या यंत्राणांना बळ देण्यासाठी मुंबईतील वेसावकरांनी कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ४ ते १० मेपर्यंत एक आठवड्याचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. याआधी ११ ते १३ एप्रिल, २४ ते २६ एप्रिल असे ३ दिवसांचे २ जनता कर्फ्यू वेसावकरांनी यशस्वी करून दाखवले होते.

एकीकडे पालिकेच्या के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाने ५५०चा आकडा पार केला असताना, वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे ५५ रुग्ण झाले असून येथे कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. वेसावा गावातील सर्व गावकऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून ४ मे ते १० मेपर्यंत असा एक आठवडा कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

वेसावा गावातील निरनिराळ्या समाज संघटना एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या सभागृहात येथील प्राचार्य व समाजसेवक अजय कौल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकारानं जनता कर्फ्यूची दिलेली हाक लक्षात घेऊन वेसाव्यातील ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाज, कोकणी सुन्नी जमात ट्रस्ट, यंग मुस्लीम कमिटी आणि इतर समाज संघटनांनी या जनता कर्फ्यूला जाहीर पाठिंबा दिला आहे.

याआधी २ वेळा २ दिवस यशस्वी केलेला जनता कर्फ्यू आणि त्या वेळचा अनुभव लक्षात घेता कोरोना रुग्णांचे १०० टक्के उच्चाटन करावे यादृष्टीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू आयोजित केला आहे. या कालावधीत वेसावे गावातील प्रत्येक गल्ली विभागातील स्वयंसेवक यावेळी साहाय्य व नियंत्रण करणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा