Advertisement

मुंबईत सर्वाधिक पेट्रोल दरवाढ, १ लिटर पेट्रोलचा 'हा' आहे भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मंगळवारी (सातव्या दिवशीही) वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत सर्वाधिक पेट्रोल दरवाढ, १ लिटर पेट्रोलचा 'हा' आहे भाव
SHARES

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत मंगळवारी (सातव्या दिवशीही) वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ७० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ११५ च्या वर गेली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील चार महागरांसह इतर शहरात प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेल दर वाढवला आहे. मुंबईत सर्वाधिक ८५ पैसे प्रति लीटरनं पेट्रोल महागलं आहे. काल सोमवारी पेट्रोल दर ३० पैसे आणि डिझेल ३५ पैसे प्रति लीटर महागलं होतं.

मंगळवारी त्याहून अधिक वाढ झाली आहे. मागील जवळपास आठ दिवसांत इंधन दर ४ रुपयांहून अधिक वाढला आहे.

शहरपेट्रोल (प्रति लिटरडीजल (प्रति लीटर)
मुंबई 115.04 99.25
दिल्ली  100.21 91.47
चेन्नई
105.94  96.00
कोलकाता 109.6894.62

राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १००.२१ रुपये आणि ९१.४७ रुपये प्रति लिटर आहेत. तर मुंबईत आता पेट्रोल ११५.०४ रुपये आणि डिझेल ९९.२५ रुपये दरानं विकलं जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७६ पैशांनी वाढला आहे. तो आता १०५.९४ रुपये आणि डिझेल ९६ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०९.६८ रुपये आणि डिझेल ९४.६२ रुपये आहे.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.



हेही वाचा

“मुंबईचे रस्ते ‘सुपर क्लीन’”, डेल स्टेनच्या कौतुकानंतर मुंबईकरांनी केली पोलखोल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा