• जोगेश्वरी लिंक रोडवर चेंबरचं झाकण खचलं
SHARE

जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवरील दत्तटेकडी बस थांब्याजवळ मुख्य रस्त्यामध्ये असलेल्या चेंबरचं झाकण खचलंय. त्याच्या दुरुस्तीकडे महापालिका के पूर्व विभागाच्या जल विभागानं दुर्लक्ष केल्याचे दिसून येतंय. त्यामुळे या ठिकाणी कधीही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी खचलेल्या झाकणाजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, मात्र चेंबरचे झाकण लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या विषयी स्थानिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या