Advertisement

हा कबुतरखाना की गाईचा गोठा?


हा कबुतरखाना की गाईचा गोठा?
SHARES

दादर ही मुंबईतील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे साहजिकच शहर आणि उपनगरातील अनेक लोक या ठिकाणी खरेदीसाठी येणार. त्यातच येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी कबुतरखाना हा मुख्य आकर्षण असतो. पण हल्ली पाहणाऱ्याला हा कबुतरखाना आहे की गाईचा गोठा? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.कबुतरखान्याला गोठ्याचे स्वरुप

येथे बाजूलाच कचरा तर साचलेला असतोच, पण सोबतच या ठिकाणी बांधलेल्या गायींमुळे हा कबुतर खाना गायींच्या गोठ्याप्रमाणे दिसत आहे. गायींसाठी ठेवलेला चारा आणि शेण कबुतरखान्याच्या सभोताली पडलेले असते. त्यामुळे हा कबुतरखाना अत्यंत गलिच्छ झाला असून त्याला गोठ्याचे स्वरुप प्राप्त झालेले आहे.महापालिका जी उत्तर विभागाने वेळेत स्वच्छता न केल्यामुळे कबुतरखान्याच्या भोवती कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख केला जातो, त्यात दादरच्या कबुतरखान्याचा उल्लेख आवर्जून करायला हवा. परंतु, सध्या याची दुरवस्था पाहून भविष्यात कबुतरखाना इतिहास जमा होतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


या गायी पालिकेकडून हटवण्यात येणार आहेत. शिवाय, या गायी पकडण्यासाठी आम्ही एक दिवस विशेष नियोजन करणार आहोत. अनेकदा ही कारवाई करताना प्राणी मित्र आडवे येतात. त्यामुळे आम्हाला या गायी नियोजनबद्धपणे हटवाव्या लागणार आहेत. त्यानंतर कोंडवाड्यात नेऊन त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त, महापालिका जी उत्तर विभाग


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा