Advertisement

सीएसएमटीहून सुटणाऱ्या शेवटच्या लोकलच्या वेळेत बदल

कोपर ते ठाकुर्ली आणि टिटवाळा ते खडवलीदरम्यान अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आली आहेत.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या शेवटच्या लोकलच्या वेळेत बदल
(File Image)
SHARES

कोपर ते ठाकुर्ली आणि टिटवाळा ते खडवलीदरम्यान अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आली आहेत. शुक्रवारी कर्जत-कसारा मार्गावरील रात्रीच्या अखेरच्या लोकलचे वेळा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे आज रात्री सीएसएमटीहून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी अखेरची लोकल सुटेल. तर कर्जतपर्यंत धावणारी अखेरची लोकल रात्री ११.३० वाजता रवाना होईल.

तर कसारा मार्गावरील अखेरच्या लोकलची वेळ आणखी आधीची असून, सीएसएमटीहून रात्री १०.५० वाजता कसाऱ्यासाठी अखेरची लोकल रवाना होणार आहे. त्यामुळे कामावरून उशिरा सुटणाऱ्यांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मार्ग : अप-डाऊन धीमा/जलद आणि पाचवा-सहावा
वेळ : आज, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० ते शनिवारी पहाटे ४.३०

टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलासाठी ब्लॉक
स्थानक : आंबिवली ते टिटवाळा

मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ ते शनिवारी पहाटे ४.४५

मेल-एक्स्प्रेस विलंबाने

रेल्वेरुळांवर पूल उभारणीसह वाशिंद स्थानकात तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने आज, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २ ते शनिवारी पहाटे ४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे (१७०५८) सिकंदराबाद-सीएसएमटी देवगिरी, (१२६१८) मंगला लक्षद्वीप आणि (१२१३८) पंजाब मेल या गाड्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल

  • कर्जत मार्ग : रात्री ११.५१ सीएसएमटी-अंबरनाथ
  • कसारा मार्ग : रात्री १०.५० सीएसएमटी-कसारा

    ब्लॉकनंतर पहिली लोकल
  • कर्जत मार्ग : पहाटे ३.४० कर्जत-सीएसएमटी
  • कसारा मार्ग : पहाटे ५.११ सीएसएमटी-टिटवाळा

    ब्लॉकमुळे स्थानकात थांबवणाऱ्या आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
  • १२१०२ शालिमार-एलटीटी आसनगाव सव्वा दोन तास
  • १२८१० हावडा-सीएसएमटी आटगाव एक तास
  • २०१०४ गोरखपूर-एलटीटी खर्डी १ तास ५५ मिनिटे
  • ११४०२ आदिलाबाद-सीएसएमटी कसारा १ तास ५० मिनिटे
  • १२५४५ रकसोल-एलटीटी कसारा १ तास ५० मिनिटे
  • १२११२ अमरावती-सीएसएमटी इगतपुरी ३० ते ५० मिनिटे

    कर्जत-पनवेल-दिवामार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
  • ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस
  • १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस
  • १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस
  • १११४० गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस



हेही वाचा

आरे-बीकेसीनंतर आता वरळीपर्यंत मेट्रो 3 धावण्याची शक्यता

मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा