Advertisement

अविघ्न टॉवर आग : करीरोड पूल वाहतुकीसाठी बंद

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं करीरोड पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अविघ्न टॉवर आग : करीरोड पूल वाहतुकीसाठी बंद
SHARES

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठ मजली इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. यामध्ये एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान व पोलीस दाखल झाले असून, त्यांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. शिवाय, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं करीरोड पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठ मजली इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा