Advertisement

मुंबई: दसऱ्यादिवशी सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड

यामध्ये सोन्याच्या नाण्यासह कानातले डूल, सोन्याचे वळे यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. काही मोठ्या सराफ दुकानांत लग्नसराईनिमित्त मंगळसूत्रांचीही विक्री झाली.

मुंबई: दसऱ्यादिवशी सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड
SHARES

दसऱ्याच्या (dussehra) दिवशी सोन्याचे दर स्थिर असल्याने किरकोळ सराफ दुकानांत (jewellery store) ग्राहकांनी गर्दी केलेली दिसली. काल सायंकाळी खरेदीचा उत्साह अधिक वाढला. मात्र घाऊक बाजारांत शुकशुकाट होता.

दसऱ्याच्या दिवशी प्रामुख्याने सोन्याची (gold) खरेदी केली जाते. यंदा सोन्याचे दर उच्चांकी असल्याने या बाजारात कमी उलाढाल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दसऱ्याच्या आधी ग्राहक सोनेखरेदी करतील, असा एक अंदाज होता.

यासाठी किरकोळ दुकानदारांनी घाऊक बाजारातून आधीच मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. 'घाऊक बाजारांत दसऱ्याच्या दोन दिवस आधीपर्यंत व झवेरी बाजारात प्रामुख्याने बुधवारी गर्दी होती.

येथून प्रामुख्याने किरकोळ दुकानदार दागिने खरेदी करतात. प्रत्यक्ष दसऱ्याच्या दिवशी मात्र घाऊक बाजारात फार ग्राहक नव्हते,' असे मुंबई झवेरी बाजार असोसिएशनचे सचिव कुमारपाल जैन यांनी सांगितले.

सोन्याचा दर गुरुवारी 1.22 लाख रुपये प्रतितोळा म्हणजेच 10 ग्रॅम होता. बुधवारीही हाच दर होता. दर स्थिर राहिल्याने सायंकाळी किरकोळ वाहकांची बाजारात गर्दी दिसली.
एक ते पाच ग्रॅम दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त होता.

यामध्ये सोन्याच्या नाण्यासह कानातले डूल, सोन्याचे वळे यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. काही मोठ्या सराफ दुकानांत लग्नसराईनिमित्त मंगळसूत्रांचीही विक्री झाली. दोन हजार 300 कोटी रुपयांच्या घरात ही उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला.

मुंबई (mumbai) ही देशभरातील सोन्याचे केंद्र असल्याने प्रामुख्याने महाराष्ट्रासह (maharashtra) कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तसेच दिल्लीतील व्यापारीही झवेरी बाजारात येऊन घाऊक खरेदी करतात.

तसेच त्यांनी सोमवार ते बुधवारदरम्यान मागील वर्षीपेक्षा यावर्षी 25 ते 30 टक्क्यांपर्यंत अधिक खरेदी केली.

यंदा सोन्याच्या नाण्यांना चांगली मागणी होती. मात्र दर उच्चांकी असल्याने पाच ग्रॅमऐवजी एक व दोन ग्रॅमची नाणी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा होता.

त्याचवेळी ग्राहक चांदीची नाणीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत होते. चांदीचे दर उच्चांकावर असताना आणखी दरवाढ होईल. या शक्यतेने 5, 10, 20, 30 व 50 ग्रॅमच्या नाण्यांना मोठी मागणी होती. चांदीचा दर गुरुवारी 1.52 लाख रुपये किलो होता.



हेही वाचा

महाराष्ट्रातील 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही

आता ठाण्याहून भाईंदर अवघ्या 20 मिनिटात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा