Advertisement

दहिसर नदी झाली गोबरमय


दहिसर नदी झाली गोबरमय
SHARES

दहिसर स्टेशनची ओळख ही दहिसर नदीवरून आहे, पण आज हीच नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्याचे रुपांतर नाल्यात झाल्याचे दिसते. या नदीच्या किनारी असलेले तबेले, धोबीघाट, शौचालय, सोसायटी यांचे सांडपाणी या दहिसर नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीचा नाला झाला. याला कंटाळून तिथल्या रहिवाशांनी पालिकेच्या स्वच्छ आणि हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लावणाऱ्या अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम)शी जोडले गेले. याच एएलएमचा भाग असलेल्या बोरिवली (पू.) येथील दौलतनगर विभागातील कृष्णा कॉ - ऑप हाऊसिंग सोसायटी दहिसर नदीच्या कडेलाच आहे. यासंदर्भात एएलएमच्या मध्यमातून अनेकदा सरकार दरबारी आवाज उठवला आहे. असे कृष्णा को - ऑप. हाऊसिंग सोसायटी एएलएमचे अध्यक्ष मयूर ओव्हरसीर (63) यांनी सांगितले.

आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोक सहभागाने आणि पालिकेच्या माध्यमातून 1998 मध्ये अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटची घाटकोपरपासून सुरुवात झाली. जी आज सुद्धा कार्यरत आहे.

दहिसर नदी प्रदूषित झाली आहे. ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले आहेत. नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी केली आहे. या नदीच्या कडेला तबेले आहेत. तबेले मालक गाईचे शेण आणि सांडपाणी याच नदीत सोडतात. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. पालिकेने यावर तोडगा काढावा. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. दरवर्षी उन्हाळ्यात नदीचे पाणी आटलेले असताना परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होते. पालिकेने वायफळ खर्च न करता दहिसर नदी प्रदूषणमुक्त करण्याकडे लक्ष द्यावे असेही शुभा राऊळ म्हणाल्या.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या आधी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतेसाठी योग्य त्या वेळी योग्य ती पावले उचलली जातात असे एएलएमचे पालिका अधिकारी सुभाष पाटील यांनी सांगितले. त्यांच्यानुसार कृष्णा कॉ - ऑप हाऊसिंग सोसायटी एएलएम हे आपल्या विभागात पूर्णपण चांगले काम करते तसेच ज्या वेळी जी काही मदत लागेल त्यावेळी पालिकेकडून ती पुरवली जाते असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा