Advertisement

एक लाख मॅनहोलचा डेटा एका क्लिकवर!

आरजीआय सॉफ्टवेअरमधून मिळणार सर्व माहिती

एक लाख मॅनहोलचा डेटा एका क्लिकवर!
SHARES

मॅनहोलचे झाकण कधी तुटले, कधी बदलले, कंत्राट कधी दिले, कंत्राट कधी संपणार, कंत्राटदार कोण याची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

मुंबईतील एक लाख मॅनहोलसंदर्भात सविस्तर माहिती आरजीआय सॉफ्टवेअरमधून उपलब्ध होणार असून यामुळे मॅनहोलचा प्रश्न वेळीच निकाली काढणे शक्य होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाची एकूण एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला.

उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई हायकोर्टाने अनेक वेळा मुंबई महापालिकेची कानउघडणी केली. मॅनहोल उघडे की बंदिस्त, याची तपासणी करण्यासाठी हायकोर्टाने नेमून दिलेले तज्ज्ञ वकील व मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी पाहणी करत अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला.

पालिका प्रशासनाने अहवाल हायकोर्टात सादर केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मॅनहोलची अपडेट वेळीच उपलब्ध व्हावी, यासाठी आरजीआय सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत असून लवकरच मॅनहोलची अपडेट आरजीआय सॉफ्टवेअरमधून उपलब्ध होईल, असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा