वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जीवघेणं गटार

 Dahisar
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जीवघेणं गटार
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जीवघेणं गटार
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जीवघेणं गटार
See all

दहिसर - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागून असलेल्या सिग्नलजवळील गटार पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलंय. या गटारात पडून अनेक जण जखमी झालेत. संध्याकाळच्या वेळेत इथं ट्राफिक जाम होते. त्यामुळे गटाराच्या कठड्यावरून पादचारी चालतात. या वेळी अनेक जण या गटारात पडलेत. 29 डिसेंबरला एक वृद्ध गटारात पडले होते. नागरिकांनी त्यांना गटारातून बाहेर काढलं. थोडक्यात त्यांचा जीव वाचला. याबाबत पालिका आर उत्तरचे दुरुस्ती आणि देखभाल विभागाचे गणेश मुंडे यांना सांगितले असता त्यांनी सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करा, असं उत्तर दिलं.

Loading Comments