• पदपथावर कचरा कंटेनर, डेब्रिजचे अतिक्रमण
  • पदपथावर कचरा कंटेनर, डेब्रिजचे अतिक्रमण
  • पदपथावर कचरा कंटेनर, डेब्रिजचे अतिक्रमण
SHARE

वडाळा - पालिकेच्या तुटलेल्या कचराकुंड्याचे कंटेनर आणि डेब्रिजचा ढीगारा गेल्या कित्येक महिन्यांपासून वडाळा स्थानकालगतच्या किडवाई मार्गावरील पदपथावर पडून आहे. याठिकाणी आधिपासून असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे घाणीचे साम्राज्य देखील वाढीस लागले आहे. त्यामुळे या अतिक्रमणाची तक्रार करायची तरी कुणाकडे? असा सवाल पादचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत महानगरपालिका एफ - उत्तर विभागाचे विभागीय कार्यकारी अभियंता नामदेव तळपे यांना विचारले असता महापालिकेच्या वतीने या ठिकाणी साठवून ठेवलेला कचरा कंटेनर आणि डेब्रिजवर कारवाई करून हा परिसर लवकरात लवकर स्वच्छ करण्यात येईल. हा मार्ग पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात असे आश्वासन त्यांनी दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या