धोबीघाटवर मंदिराचे रॅबीट तसेच

 Mumbai
धोबीघाटवर मंदिराचे रॅबीट तसेच

धारावी - धोबीघाट नाल्यावर अतिक्रमण करुन कालीमाता मंदीर बांधण्यात आले होते. महापालिकेने 13 जूनला या ठिकाणचे अतिक्रमण हटवले होते. पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेने या ठिकाणी बांधण्यात आलेले कालीमाता मंदिर 23 सप्टेंबर ला पाडले. त्यानंतर नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्याकरता मंदिर पाडलेलं रॅबीट उचलुन नाले सफाई करण्याची गरज होती. परंतु आज इतके दिवस होऊनही या ठिकाणी मंदिर पाडल्यानंतर मंदिराचे रॅबीट धोबीघाट नाल्याशेजारी पडून आहे. या नाल्यामुळे परीसरात पूर्वीपासूनच दुर्गंधी आहे परंतु हे मंदिर पाडल्यामुळे या मध्ये अधिकचं भर झालेली दिसून येत आहे. या अतिक्रमणाचा दुर्गंधीचा त्रास होत असल्यामुळे स्थानिकांनी महापालिकेकडून नालेसफाईची मागणी केली होती. अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न पालिकेने केला देखील परंतु हे मंदिर पाडून पालिकेने रॅबीट त्याच जागी टाकले आहे नालेसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागात रहाणा-या हजारो कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न उद्धभवत आहे. पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरीक मात्र नाराज झाले आहेत.

Loading Comments