Advertisement

राज्यात पुन्हा वाढतोय कोरोना, ''कठोर निर्णय...''; अजित पवारांचे संकेत

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं पुन्हा कडक निर्बंध लागू होणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात पुन्हा वाढतोय कोरोना, ''कठोर निर्णय...''; अजित पवारांचे संकेत
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन पुन्हा सज्ज झालं आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत राज्यात पुन्हा एकदा निर्बंधांचे संकेत दिले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं पुन्हा कडक निर्बंध लागू होणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर ''राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांत संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेतील'', असं अजित पवार यांनी म्हटलं.

मंगळवारी मुंबईत १ हजाराच्या वर तर महाराष्ट्रात २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढती रुग्णसंख्या पाहता राज्याच पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विधान केलं आहे. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्हाला पुन्हा लॉकडाऊन पाहायचा नाही आहे, आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा