विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष

 Bhendi Bazaar
विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष
विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष
विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष
विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष
विकास कामे अपूर्णच, पलिकेचं दुर्लक्ष
See all

नळबाझार - आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विभागातील विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर धरला होता. भूमिपूजन केल्यानंतर कामाला सुरुवात तर केली पण त्या कामची गती मंदावलेली दिसत आहे. कुंभारवाडा, दोनटाकी आणि नळबाझार या ठिकाणी रस्त्याची कामे करण्यासाठी खड्डे पाडण्यात आले आहेत. पण आचारसंहितेमुळे काम पूर्ण होताना दिसत नाही.

या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय मार्केट जवळच असल्याने अनेक ठिकाणी काही दिवस अाधी पाइपलाइनचं काम करण्यात आलं होतं. शिवाय ठिकठिकाणी बॅरिगेट्स तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवर योग्य प्रकारे काँक्रिटीकरण करावे जेणे करून ये-जा करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. वाहतूक खोळंबाही होणार नाही असं स्थानिक रहिवसी विलास तुपे यांनी सागितलं.

Loading Comments