SHARE

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रात्री १२ वाजल्यापासून भविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. अंगारकीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. तर सिद्धिविनायकासाठी फुलांची खास आरास करण्यात आली आहे.


रात्रीपासूनच भाविकांची गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रात्री १२ वाजता बाप्पाची विशेष महापूजा करण्यात आली होती. या पूजेनंतर दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. त्यानंतर रात्रीपासून मोठ्या संख्येनं भविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावली.


बाप्पाच्या दर्शनाची वेळ

अंगारकीनिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि रात्री ९.५० ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
बाप्पाच्या दर्शनासाठी पुरुष, महिला, अपंग आणि गर्भवतींसाठी वेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत. दत्ता राऊळ मार्गाकडून महिलांची रांग सोडण्यात आली असून रविंद्र नाट्य मंदिराच्या बाजूनं पुरुषांची रांग सोडण्यात येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या