Advertisement

मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल


मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल
SHARES

मुंबई - मुंबईत गुरुवार, 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी 6 ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतदान कार्यालय आणि मतमोजणीची ठिकाणे येथील वा‍हतूक मार्गात बदल केले जाईल. या दरम्यान नवजीवन सोसायटी ते गिल्डर लेन पालिका शाळा याठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी, सी आणि डी वॉर्ड यांनी परवानगी दिलेल्या वाहनांखेरीज पोलीस, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांना नवजीवन सोसायटी ते गिल्डर लेन, म्युनिसिपल शाळा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर तेथे वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त, (शहरे) वाहतूक, मुंबई यांनी कळवले आहे.

वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून डॉ. दा. भ. मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त (शहरे), वाहतूक, मुंबई यांनी केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा