कुत्र्यांच्या मालकांकडून पालिकेची दंडवसूली

 Marine Drive
कुत्र्यांच्या मालकांकडून पालिकेची दंडवसूली

मरिन ड्राइव्ह - मरिन ड्राइव्हवर फिरायला जाण्याची हौस प्रत्येकालाच असते. यात काहींना आपल्या कुत्र्यासोबत फेरफटका मारायला आवडतं. पण हीच हौस या कुत्र्यांच्या मालकांना महागात पडलीय. कारण कुत्र्यांना फिरवायच्या नादात त्यानं केलेल्या घाणीकडं या मालकांनी कानाडोळा केल्याबद्दल महापालिकेनं आठवड्याभरात सात जणांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केलाय.

ए वॉर्ड पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना ही माहिती दिली. मरिन ड्राइव्हची स्वच्छता कायम राहावी आणि स्वच्छतेचं महत्त्व सर्वांनाच पटावं यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading Comments