Advertisement

चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त चेंबूरमध्ये शुक्रवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात दरवर्षीप्रमाणे पालिकेकडून जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

संपूर्ण उद्यान परिसराला विविध रंगीबेरंगी विदयुत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे चेंबूर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. गुरुवारी रात्रीपासूनच चेंबूरच्या विविध परिसरातून अनेक मिरवणुका आंबेडकर उद्यान परिसरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून चेंबूरमधील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा