Advertisement

मुसळधार पावसामुळे दादर, परळमध्ये पाणी तुंबले


मुसळधार पावसामुळे दादर, परळमध्ये पाणी तुंबले
SHARES

मुंबईतील नालेसफाईचं काम शंभर टक्के झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा दावा सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसात फोल ठरला. रात्री मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत घर गाठावं लागलं.

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या 60टक्के नाले सफाईची कामं 100 टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला हाेता. मात्र सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसात दादर, परळ, हिंदमाता, गोवंडी, शिवडी, वरळी, भायखळा, चेंबूर, सांताक्रूझ, खार आदी भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत.

दादरमधील न. चिं. मार्गावर यापूर्वी कधीही पाणी तुंबल्याचे प्रकार घडलेले नाहीत. पण यंदा शिवाजी मंदिर, प्लाझासमोर ढोपरापर्यंत सखल भागात पाणी तुंबल्याने वाहतूकोंडी झाली होती. याशिवाय रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखाली देखील पाणी साचले. रस्त्याकडील मेनहोलमध्ये कचरा साचल्यामुळे या भागांत पाणी तुंबल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु महापालिका आयुक्तांनी पाणी उपसा करण्यासाठी गणवेशधारी कामगारांना तैनात करूनही ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा