Advertisement

गुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपात


गुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपात
SHARES

मालाड जलाशयाला जोडणाऱ्या जलवाहिनीच्या दुरूस्तीकामासाठी २५-२६ जुलै रोजी बोरीवली ते गोरेगाव परिसरातील काही भागात पाणीकपात करण्यात येईल. जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम गुरूवार २५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून सुरू करण्यात येईल. हे काम २६ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील. या वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर या कामाचा परिणाम होईल.  

मालाड जलाशयाला जोडणाऱ्या २४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला १५०० मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी जोडण्याचं काम गुरूवारी मध्यरात्री करण्यात येईल. या दुरूस्ती कामादरम्यान गोरेगाव पूर्व आणि पश्चिम, मालाड पूर्व आणि पश्चिम, कांदिवली पूर्व आणि पश्चिम तसंच बोरीवली पश्चिमेकडील भागांत पाणीकपात करण्यात येईल.

पाणीकपातीमुळे मुंबई महापालिकेने या परिसरातील रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.  हेही वाचा-

हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

कोस्टल रोडचं भवितव्य अधांतरीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा