Advertisement

एल्फिन्स्टनच्या मीनाताई ठाकरे मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य


एल्फिन्स्टनच्या मीनाताई ठाकरे मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य
SHARES

एल्फिन्स्टन स्थित सेनापती बापट-मार्गावरील मीनाताई ठाकरे मच्छीमार्केटच्या परिसरात स्वच्छ भारत अभियानाचा भलताच फज्जा उडालेला पहायला मिळत आहे.

या परिसरात असलेली स्वराज्य हाऊसिंग सोसायटी, हनुमाननगर हाऊसिंग सोसायटी यामध्ये राहणारे नागरिक गेली १७ वर्षे हा त्रास सहन करत आहेत. दररोज 6 ते 7 च्या सुमारास येथे आंध्रप्रदेश मधून ट्रकच्या ट्रक भरून मासे येतात आणि मार्केटमध्ये उतरवले जातात. मासे सुरक्षित राहण्यासाठी वापरण्यात आलेला भुसा तसेच थर्माकोल हे सर्व रस्त्यावर इतरत्र फेकून दिलेल असल्याने या परिसरात घाणीचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत आहेत. पादचारी तसेच वाहन चालकांना देखील या परिसरातून वाहन चालवणे कठिण जात आहे .


सोसायटीतील सर्व नागरिकांना गेली कित्येक वर्षे हा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वत्र भुसा, थर्माकोल पसरलेला आणि मासे विक्रेते तिथेच पाणी सांडून ठेवतात. यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या रस्त्यावरून चालणारे पादचारी असो वा वाहनचालक असोत सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच वेळा अपघात देखील झाले आहेत. वाहतूक कोंडी तर रोजची समस्या या मार्केटमुळे झाली आहे.
- महेश कदम, रहिवासी, स्वराज्य हाऊसिंग सोसायटी


आम्ही वारंवार पालिकेकडे तसेच स्थानिक नगरसेविका प्रीती पाटणकर, स्थानिक पोलीस स्टेशन या सर्व ठिकाणी तक्रार केली असून देखील फक्त आश्वासन मिळत आहेत. प्रत्यक्षात मात्र उपाय काहीच नाही.
- अशोक मस्कर, अध्यक्ष, स्वराज्य सोसायटी

या सोसायटी कमिटीचे सदस्य पांडुरंग कदम म्हणाले, हे मच्छीमार्केट इथे नको या ठिकाणाहून हे मार्केट स्थलांतरीत करावे जेणेकरून आम्हाला होणारा नाहक त्रास कमी होईल.

भारतभर स्वच्छ भारत अभियान सुरू असताना एल्फिन्स्टन रोड येथील सनशाईन टॉवर आणि स्वराज्य हाउसिंग सोसायटीबाहेर मात्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

गेली अनेक वर्षे इथे मच्छीमार्केट असून संध्याकाळी 7 च्या सुमारास माशांचे ट्रक रोज भरून येतात. पहाटे सुरू झालेली माशांची विक्री दुपारी 1 पर्यंत सुरूच असते. या सगळ्याचा येथील नागरिकांना खूप त्रास होतो आणि त्यात रोड अपघात आणि ट्राफिक जाम या सगळ्यांची भर पडते. या सर्व समस्येकडे पालिका, स्थानिक आमदार, शासन किंवा पोलिस अधिकारी कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे.

या संदर्भात माहितीसाठी महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांना संपर्क साधला असता 'हे व्यवस्थापन सांभाळणारे कोरडे यांच्याशी संपर्क साधाण्यास सांगितले, त्यांच्याशीही दोन वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे यावर भाष्य केले नाही तसेच फोनलाही उत्तर दिले नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा