कचरा संकलन डब्यांचे वाटप

 BMC office building
कचरा संकलन डब्यांचे वाटप

परळ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्या निधीतून आणि मुंबई महानगरपालिका घनकचरा विभागाच्या सहकार्यातून 3000 कचरा संकलन डब्यांचं वाटप होणार आहे. त्यापैकी 1700 डब्यांचं वाटप बुधवारी परळ- भोईवाडा परिसरात करण्यात आलं. महात्मा गांधी वसाहत, बेस्ट वसाहत आणि भोईवाडा आेमकार इमारतीत हे डबे वाटण्यात आले. या वेळी शाखाप्रमुख राजन आबिटकर, महिला शाखा संघटक वैशाली चौधरी, उपशाखाप्रमुख चंद्रकांत वापिलकर, प्रवीण फाटक, अनिल राऊळ, दीपक भोपते, मीरा निंबाळकर, साधना राऊळ, अलका पाटील, स्थानिक रहिवासी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments