Advertisement

आणखी आठ कैदी जे. जे. रुग्णालयात दाखल


आणखी आठ कैदी जे. जे. रुग्णालयात दाखल
SHARES

भायखळा कारागृहात जेवणातून विषबाधा झालेल्या तब्बल 300 कैद्यांमध्ये 85 महिलांसह एक पुरुष आणि एक चार महिन्यांच्या बाळाला उपचारकरता जे. जे. रुग्णालयात दाखल केलं होतं. परवा त्यापैकी 79 कैद्यांना सोडण्यात आलं होत. परंतु यामधील आठ कैद्यांना पुन्हा पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रविवारी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


महिला आयोगाने घेतली भेट

भायखळा कारागृहात अन्नातून विषबाधा झाल्याने 300 महिलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामध्ये 85 महिलांसह 3 गर्भवती आणि एक चार महिन्यांच्या बालाला जेजेत दाखल केलं होतं. शनिवारी 21 जुलै रोजी 87 पैकी 79 कैद्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना सोडण्यात आलं तर गर्भवती महिलांना 48 तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या विंदा कीर्तिकर आणि अॅड. आशा लांडगे यांनी शनिवारी कैद्यांची भेट घेत भायखळा कारागृहाची पाहणी केली.

शनिवारी एकंदरीत सर्वच कैद्यांची प्रकृती स्थिर होत असताना कारागृहातून आणखी 8 कैद्यांना शारीरिक व्याधींमुळे जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये 7 महिला तर 1 पुरुष कैदीचा समावेश आहे.


हेही वाचा -

Exclusive: भायखळ्यातील 'त्या' कैद्यांना अन्नबाधा की औषधबाधा?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा