Advertisement

पहिल्या, दुसऱ्या डोसनंतरही होतोय कोरोना

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक जालीम उपाय असल्यानं नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत.

पहिल्या, दुसऱ्या डोसनंतरही होतोय कोरोना
SHARES

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक जालीम उपाय असल्यानं नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यानुसार, अनेक नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला तसेच दुसरा डोस घेतला आहे. मात्र लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे.

मुंबईत २३ हजार २३९ लसवंताना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी या लशी प्रभावी नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या २३ हजार २३९ कोरोनाबाधित लसवंतांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ही १४ हजार २३९ इतकी आहे. तर दोन्ही लस घेतलेल्यांचा हा आकडा ९ हजार इतका आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने लस प्रभावी नाहीये का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा