नॅशनल पार्कमध्ये 'राधा' बिबट्याचा मृत्यू

 Borivali
नॅशनल पार्कमध्ये 'राधा' बिबट्याचा मृत्यू

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'राधा' या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. या मादी बिबट्याचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला असून, गेले 15 दिवस ती आजारी होती. 2004 साली 'राधा'ला राधानगरी,कोल्हापूर येथून नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं होतं. त्यावेळी तिचं वय अंदाजे 3 ते 4 वर्ष होतं. आता या मादी बिबट्याचं वय अंदाजे 18 वर्ष असल्याचं बोललं जात आहे. बिबट्या जन्मापासून साधरणत: 12 ते 14 वर्ष जगतात. नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक बिबटे, वाघ पाहण्यासाठी येत असतात.

Loading Comments