Advertisement

लोखंडवाला येेथे इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग


लोखंडवाला येेथे इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग
SHARES

अंधेरी, लोखंडवाला येथील शास्त्रीनगरमधील एका इमारतीतील सहाव्या मजल्याला सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आग लागली. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. सुर्दैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही.

महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेल नसून ही आग ६ वाजून १० मिनिटांनी विझवण्यात आली.



शास्त्रीनगर येथे 'ग्रीन व्ह्यू' ही ७ मजल्यांची निवासी इमारत आहे. या इमारतीतील सहाव्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि काही मिनिटांतच अग्निशमन दलाने ही आग विझवली. या आगीत सहाव्या मजल्यावरी घरांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवतीहानी झाली नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा