Advertisement

पवईतील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग


पवईतील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग
SHARES

मुंबईतील पवई इथल्या साकी विहार रोडवर भीषण आग लागली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनी समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. आगीमुळे धुरांचे लोळ सभोवतालच्या परिसरात पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत.

या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळं वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. शोरूम मधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, या आगीमुळं बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचं प्रयत्न सुरु आहेत. सर्विस सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आगीमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत.

या ठिकाणी सुरु असलेल्या मदत आणि बचावकार्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. आगीत कोट्यवधीच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी पोहोचत असून परिस्थितीचा आढावा त्या घेतील. दरम्यान, आगीत अद्याप किती नुकसान झालं, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा