Advertisement

सेंट्रल प्लाझा मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग


सेंट्रल प्लाझा मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग
SHARES

मालाड पूर्वेकडे असलेल्या सेंट्रल प्लाझा मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळी ११.१२ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


आग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी ५ फायर इंजिन, ४ जेटी आणि दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा