Advertisement

नवी मुंबईतील डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग

नवी मुंबईच्या डी. वाय पाटील इमारतीला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

नवी मुंबईतील डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग
SHARES

नवी मुंबईच्या डी. वाय पाटील इमारतीला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. आग लागलेली या इमारतीमध्ये मुलींचं हॉस्टेल आहे. ही आग मोठ्या प्रमाणात लागली असली तरी आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्रिशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणी इमारतीत अडकलं आहे का याचा शोध अग्निशमन दलाकडून सुरू आहे. हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीची तिव्रता जास्त होती आणि परिसरात धूर पसरला.

शॉक सर्किटमुळे थर्माकोलला आग लागली आणि त्याचा भडका उडाला. पण वेळीच अग्निशमन दलाला प्राचारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. आग विझली असली तरी अद्याप परिसरात धुराचे लोळ आहेत. तर कोणी इमारतीमध्ये आहे का याचाही शोध पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा