Advertisement

वांद्र्याच्या शास्त्रीनगर परिसरात भीषण आग


वांद्र्याच्या शास्त्रीनगर परिसरात भीषण आग
SHARES

वांद्रे येथील नर्गिसनगरमधील झोपडपट्ट्यांना आग लागून एक महिनाही उलटला नाही तोच मंगळवारी पुन्हा एकदा वांद्र्यातील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्ट्यांना आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

वांद्रे स्थानकाबाहेरील शास्त्रीनगर परिसरात सकाळी १० वाजून २७ मिनिटांनी ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


कशी लागली आग?

सिलेंडरच्या स्फोटामुळं ही आग लागल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा