डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली आग

 Dombivali
डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली आग

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशनजवळील पादचारी पुलाखाली शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पादचारी पुलाखाली फेरीवाल्यांची दुकानं आहेत. या फेरीवाल्यांच्या दुकानाचा कचरा हा पुलाच्या भिंंतीला लागूनच टाकलेला असतो. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञातांनी या कचऱ्याला आग लावली. काही वेळानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोट पुलाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचले. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. दरम्यान अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

Loading Comments