Advertisement

उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग

उल्हासनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे.

उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग
SHARES

उल्हासनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. कॅम्प नंबर ३ परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ३ हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरातल्या एका इमारतीला आग लागली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या कार्यलयाला ही आग लागली आहे. या दुर्घटने संदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.

सध्या तरी आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेत तिसरा मजला जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा