Advertisement

मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी...

जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली

मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी...
SHARES

मुंबईतील मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुणी बाल्कनीतून खाली उडी मारून आपला जीव वाचवताना दिसत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीत आग लागली ती जनकल्याण नगरमधील आहे. आगीचे कारण शोधले जात आहे.

जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा