Advertisement

रिक्षाचालकांना मिळाले अपघातग्रस्तांना वाचविण्याचे प्रशिक्षण


रिक्षाचालकांना मिळाले अपघातग्रस्तांना वाचविण्याचे प्रशिक्षण
SHARES

जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाने आयोजित केलेल्या शिबिरात रिक्षाचालकांना अपघातग्रस्त प्रवाशांना वाचविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात 'न्यू मिरा रोड, भाईंदर रिक्षा चालक-मालक संघटने'तील 50 रिक्षाचालकांनी भाग घेतला होता.

या शिबिरात प्रशिक्षणार्थी रिक्षाचालकांना अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रक्तस्त्राव थांबवणे, त्यांच्या पाठीचा कणा सरळ ठेवणे, अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना कळविणे, रुग्णाचे मनोबल वाढविणे, जखमी व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू ठेवणे आणि प्राथमिक उपचारांद्वारे जखमी व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

याविषयी वोक्हार्ट रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी म्हणाले की, रस्ते अपघातात प्रवाशांना कमीअधिक प्रमाणात शारिरीक इजा होते. परंतु प्रत्येक अपघातात त्यांना त्वरीत उपचार मिळाली पाहिजे. त्याद्वारे अपघातग्रस्ताचे प्राण आणि अवयव वाचवू शकतात. रस्ते अपघातात मुख्यतः हात आणि पायांना गंभीर मार लागतो. त्यांना वेळेवर रुग्णालयात न आणल्यास जंतुसंसर्गामुळे अपघातग्रस्तांचे पाय आणि हात कापावे लागू शकतात. अगदी 10 ते 15 मिनिटांच्या विलंबामुळेही अपघातग्रस्तांना शरीराचा अवयव आयुष्यभरासाठी गमवावा लागू शकतो. रिक्षाचालकांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यामागे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणे हाच उद्देश असून आम्ही ठाणे आणि पालघर इथल्या रिक्षाचालकांनाही असे प्रशिक्षण देणार आहाेत.

गेल्या 10 वर्षांत रस्त्यांवर वाहनांच्या संख्येसोबतच वाहन चालकांचा बेशिस्तपणाही वाढला आहे. या वाहनचालकांना दुसऱ्याबरोबरच स्वतःच्या जीवाचीही पर्वा राहिलेली नाही. रिक्षाचालक शहरातल्या वाहतूक यंत्रणेतील महत्त्वाचा घटक असून रस्ते अपघातात त्याच्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. या कार्यक्रमादरम्यान गर्भवती महिलांचे भाडे नाकारणार नाही, अशी शपथही या रिक्षाचालकांनी घेतली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा