Advertisement

जनगणना 2027 मध्ये प्रथमच डिजिटल डेटा संकलन

महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे म्हणतात की, स्व-गणना ऐच्छिक असून अनिवार्य नाही.

जनगणना 2027  मध्ये प्रथमच डिजिटल डेटा संकलन
SHARES

केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार, माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता व कार्यक्षमता सुधारणे आणि वेळेवर पूर्ण करणे या उद्देशाने, 2027 च्या जनगणनेत (Counting) डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जाईल.

भारतीय जनगणनेच्या (Census) इतिहासात प्रथमच, स्वयं-गणना प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे लोकांना त्यांच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन सादर करता येईल.

देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेसाठी माहिती संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल, ज्यामध्ये स्वयं-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल.

महाराष्ट्र राज्यासाठी, घरांची यादी आणि कुटुंब जनगणना सुरू होण्यापूर्वी स्वयं-गणनेसाठी 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत 15 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

मुंबईत (mumbai) आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राच्या (maharashtra) मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. यांनी सांगितले की, भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल तयार केले आहे.

जे जनगणनेत सहभागी होण्याचा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग उपलब्ध करून देते. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in वर उपलब्ध आहे.



हेही वाचा

मुंबई मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब होणार

पावसाळ्यापूर्वी मुंबईत पायाभूत सुविधांची पाहणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा