फुटपाथ की बिनभाड्याचे गोडावून?

 Kandivali
फुटपाथ की बिनभाड्याचे गोडावून?
फुटपाथ की बिनभाड्याचे गोडावून?
See all

कांदिवली - पश्चिमेतील साईधामसमोरील महामार्गाशेजारच्या फुटपाथचा वापर गोडावूनसारखा करण्यात येत आहे. येथे ठिकठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा याकडे कानाडोळा झाला आहे.

या परिसरात एका बाजूला अनधिकृत वस्ती आणि व्यावसायिकाने बांधकाम साहित्याची थेट फुटपाथवर साठवणूक केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस. एस. देशमुख यांनी मात्र अशी कोणतीही बाब आमच्या बघण्यात आली नसल्याचे मुंबई लाईव्हला सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ताबा असलेल्या महामार्ग सर्व्हिस रोडचा बिनभाड्याच्या गोडावूनसारखा वापर होत असल्याने वाहतूक कोंडीस अामंत्रण मिळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments