Advertisement

Ghatkopar Hoarding Accident : उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री

घाटकोपरमध्ये झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Ghatkopar Hoarding Accident : उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री
SHARES

घाटकोपरमध्ये झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घाटकोपरमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीनं हटवण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा फोनवरुन आढावा घेतला असून घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीनं हटवण्याचे आदेश दिले आहेत. होर्डिंगखाली अडकून जखमी झालेल्या नागरिकांच्या भेटीला मुख्यमंत्री राजावाडी रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे. तसेच अवकाळी पावसामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. 

अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आज मुंबईत दाणादाण उडाल्याचं दिसून आलं. मुंबईत आज दोन मोठे अपघात घडले. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत 47 जणांना बाहेर काढलंय. 



हेही वाचा

मुंबईतील 'या' भागात पाणीकपात

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा