Advertisement

भिवंडीमध्ये इमारत कोसळली, कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

भिवंडीमध्ये (Bhiwandi) एक मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

भिवंडीमध्ये इमारत कोसळली, कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
SHARES

भिवंडीमध्ये (Bhiwandi) एक मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ८-९ मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

भिवंडी तालुक्यातील दापोडामध्ये हरिहर कंपाऊंड इथं गोदाम असलेली एक मजली इमारत सकाळी कोसळली. या इमारतीमध्ये काही मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी भिवंडी अग्निशमन केंद्राचे ३ फायर वाहन दाखल झाले आहे. तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षा, ठाणे अग्निशमन केंद्र तसंच ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक (TDRF) मदतीसाठी रवाना झाले आहेत. तसंच NDRF पथकाला मदतीसाठी आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच... 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा