36 स्थानकांचे सुशोभिकरण

 Dadar
36 स्थानकांचे सुशोभिकरण
36 स्थानकांचे सुशोभिकरण
36 स्थानकांचे सुशोभिकरण
36 स्थानकांचे सुशोभिकरण
See all

दादर - मेकिंग अ डिफरन्स फाऊंडेशन आणि मुंबई फर्स्ट यांच्याकडून 'हमारा स्टेशन हमारी शान' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ रविवारी दादर आणि वांद्रे स्थानकात करण्यात आला. या अभियानांतर्गत शहरातील 36 स्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

हे अभियान 2 ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या अभियानात मेकिंग अ डिफरन्स फाऊंडेशन आणि मुंबई फर्स्ट यांच्यासोबतच इतर अनेक संस्थाही सहभागी होणार आहेत. एमएडीचे संस्थापक हरेश शाह आणि मुंबई फर्स्टचे सीईओ शिरिश जेशी यांनी सांगितले की या अभियानात 10 हजारहून अधिक स्वयंसेवक सहभागी होतील. ते कमी गर्दीच्या वेळी स्टेशनच्या रंगरंगोटीचे काम करतील.

Loading Comments