पालिकेनं हटवलं अतिक्रमण

 BMC office building
पालिकेनं हटवलं अतिक्रमण
पालिकेनं हटवलं अतिक्रमण
पालिकेनं हटवलं अतिक्रमण
पालिकेनं हटवलं अतिक्रमण
See all

परेल - गुरुवारी सकाळी एफ दक्षिण विभागात पालिकेच्यावतीनं अतिक्रमण हटवण्यात आलं. अतिक्रमण हटवताना हस्तांतरित करण्यात आलेल्या हातगाड्या महापालिकेच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात येतात. कालांतराने दंड भरून गाडी सोडवण्याचा प्रयत्न फेरीवाले करतात. त्यामुळे अतिक्रमणाला आळा बसत नाही. यासाठी कारवाईत हस्तांतरित करण्यात आलेल्या हातगाड्या एकत्र करून महापालिका एफ दक्षिण विभागात गुरुवारी पूर्णपणे तोडण्यात आल्या. प्रत्येक महिन्याला सर्व गाड्या एकत्र करून तोडल्या जातात. गुरुवारी तोडण्यात आलेल्या सर्व हातगाड्या ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आल्या होत्या. जागेअभावी जमा केलेल्या हातगाड्या मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या गोडावूनमध्ये ठेवण्यात येतात. एफ दक्षिण विभागातील या अतिक्रमानाचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी राहणारे स्थानिक नागरिक देखील फूटपाथवर अतिक्रमण करतात त्यामुळे विभागातील अतिक्रमण हटवणे हे महापालिकेला कठीण झाले आहे. एफ दक्षिण विभागात के इ एम , वाडिया हॉस्पिटल हिंदमाता मार्केट असल्यामुळे फळ विक्रेते, कपडे विक्रेत्यांचे अतिक्रमण जास्त प्रमाणात होते. प्रत्येक महिन्यात जमा केलेल्या हात गाड्या गोडावूनमध्ये ठेवणे पालिकेला शक्य नाही. गुरुवारी अशा 75 हात गाड्या एफ दक्षिण विभागाच्या महापालिका कार्यालयासमोर तोडण्यात आल्या. यावेळी एफ दक्षिण विभागाचे वॉर्ड ऑफिसर विश्वास मोटे यांच्यासह बीएमसीचे सुरक्षा रक्षक विलास पंदीरकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments