Advertisement

फेरीवाल्यांचं महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन


फेरीवाल्यांचं महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्यामुळे होणाऱ्या त्रासाचं गाऱ्हाणं घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिकेत आले असतानाच आता व्यवसायासाठी हक्काची जागा द्या, अशी मागणी करत गुरुवारी फेरीवाल्यांनी पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन केलं.


३१७ फेरीवाल्यांचं ठिय्या आंदोलन

घाटकोपर येथील हिंगवाला मार्केटमधील 'छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाला संघ’, महाराष्ट्रच्या वतीने ३१७ फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर गुरुवारी ठिय्या आंदोलन केलं.


पालिकेला घातला घेराव

फेरीवाल्यांचं पुर्नवसन, फेरीवाल्यांना अधिकृतपरवाना देण्यात यावा आणि पालिकेच्या एन वार्डातून होणारा त्रास थांबवण्याच्या मागण्यांसाठी या फेरीवाल्यांनी पालिकेला घेराव घातला. यावेळी फेरीवाल्यांनी भाज्यांच्या टोपल्या पालिकेबाहेर ठेवून ठाण मांडत पालिकेविरोधात घोषणाबाजी केली. काही आंदोलनकर्त्यांनी पालिकेच्या गॅलरीत चढून घोषणाबाजी करत राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला.


आंदोलनकर्त्यांना रोखलं

आंदोलन हाताबाहेर जाण्याआधीत आझाद मैदान पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्यांना रोखत त्यांना आझाद मैदानात नेत या फेरीवाल्यांच्या मागण्यांचं पत्र पालिका आयुक्तांपर्यंत पोहचवलं आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास पालिका प्रशासनाला धारेवर धरत आत्मदहनाचा इशारा या फेरीवाल्यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा