Advertisement

परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २६ मार्चला सुनावणी

अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २६ मार्चला सुनावणी
SHARES

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे. अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. २६ मार्च रोजी परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अँटालिया स्फोटकं प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. आपल्याला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून आकसाने हटविण्यात आले असून आपली बदली रद्द करावी, अशी विनंती देखील या याचिकेत सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. 

परमवीर सिंह यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटविताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपालांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना घरी बोलावून हॉटेल, बार, आणि पब व इतर अस्थापनांकडून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करून देण्यास सांगितले, असा आरोप केला आहे. या पत्रासह परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात  १३० पानांची याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेत परमवीर सिंह यांनी आपली बदली आयपीएस सेवा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. परमबीर सिंह यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी मांडणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा